२१ दिवस बसणारा खवळे गणपती विसर्जनाच्या दिवशी - होते पिंडदान
खवळे गणपती ह्या महत्वाच्या गणेशोत्सवाच्या आयोजनात आणणारा गणपती देवता आहे. त्याच्या स्थापनेच्या दिनानुसार, तुमच्या उपास्य गणपतीच्या मूर्तीला २१ दिवस बसण्याची आवश्यकता आहे. याच दरम्यान, गणपती मूर्तीला विधीवत उपचार केल्याने आणि त्याच्या पूजाच्या आयोजनात भाग घेतल्याने दिवसाच्या व्रताने गणपती देवतेच्या आशीर्वादाची प्राप्ती होते.
आपल्याला गणपती मूर्तीची स्थापना कसी करावी त्याची माहिती असल्यास, किंवा गणपती देवतेच्या पूजाच्या विधीवत आयोजन कसे करावे त्याची माहिती असल्यास, कृपया तुमच्या स्थानिक संस्कृतीच्या आधारावर आधारित गोष्टी कोणत्याही पंथाने आपल्याला सांगण्यात येईल.
कोकण हे गणेशोत्सवासाठी विशेष प्रसिद्ध आहे. मोठ्या उत्साहामध्ये आणि दिमाखात इथं गणेशोत्सव साजरा केला जातो. चाकरमानी, शिक्षणासाठी दूर गेलेले विद्यार्थी गणेशोत्सवासाठी खास, वेळात वेळ काढून कोकणात येतातच. कोकणामधील विविध गणपतींना वैशिष्ट्यपूर्ण परंपरा लाभलेल्या आहेत. त्यातलात एक गणपती म्हणजे खवळे कुटुंबीयांचा गणपती.
सिंधुदुर्गातल्या खवळे कुटुंबीयांच्या या गणपतीला ३२० वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभलेली आहे. या गणपतीचा उत्सव २१ दिवस साजरा केला जातो. यामध्ये गणपतीची तीन वेगळी रुपे साकारली जातात. विसर्जनाच्या दिवशी या गणपतीसमोरच खवळे कुटुंबीय आपल्या पूर्वजांना पिंडदान करतात. या गणपतीची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झालेली आहे.
देवगडपासून २ किलोमीटरवर असलेल्या गाबतमुमरी किंवा तारामुंबरी या गावामध्ये हे खवळे कुटुंब राहतं. या घराण्यात ३२० वर्षांपासून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. खवळे घराण्यातील शिवतांडेल हा सरदार कान्होजी आंग्रे यांच्या आरमारामध्ये होता.
शिवतांडेल यांच्या लग्नाला ७ वर्षे होऊनही त्यांना मूल होत नव्हतं. एके दिवशी ते झोपेत असताना मालवण या मूळ गावातल्या नारायण मंदिरातल्या गणपतीने दृष्टांत दिला आणि आपली स्थापना कऱण्यास सांगितलं. १७०१ मध्ये या गणपतीची स्थापना करण्यात आली.
नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारण अर्पण करून या मूर्तीचं काम सुरू होतं. ही मूर्ती पावणेसहा फूट उंचीची असते. ही मूर्ती बनवण्यासाठी जवळपास दीड टन माती वापरली जाते. ही मूर्ती खवळे कुटुंबातल्या व्यक्ती स्वतः तयार करतात. गणेश चतुर्थी दिवशी पांढरा चुना लावलेली, फक्त डोळे रंगवलेली मूर्ती असते, तिची पूजा केली जाते. साधारण पाचव्या दिवशी या मूर्तीचं रंगकाम पूर्ण होतं.
-------------
*स्वतः बरोबरच*
*कुटूंबाची काळजी घ्या.*
*स्वस्थ रहा, मस्त रहा*
-------------


